कोल्हापूर : मुलींच्या रक्षणासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून “मी दुर्गा” हा उपक्रम राबविला जात आहे. जरगनगर येथे लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर मधील तसेच कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम हायस्कूल, शुगरमिल हायस्कूल, जीवन कल्याण प्राथमिक शाळा, वाय.बी. पाटील हायस्कूल, कन्या प्रशाला, बलभीम विद्यालय मधील शालेय मुलींना पूजा ऋतुराज पाटील यानी या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन केले.
डॉ. कविता कबाडे व डॉ. प्रीती नाईक यांनी मुलींना मार्गदर्शन केलं. आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू, स्वतः सक्षम बनू असा संकल्प यावेळी मुलींनी केला.
यावेळी दक्षिण शहर महिला अध्यक्षा वैभवी जरग, मृणाल शिरोडकर, दीपाली कांबळे, वैशाली पाडेवार, सिंधू शिरोळे, शिवाजी पाटील, मनोहर सरगर, संदिप जाधव, शकुंतला मोरे, स्मिता कारेकर, अर्चना सुतार, सुजाता पोळ, प्राजक्ता भडंगे, पल्लवी काळे, सुवर्णा सोनाळकर, माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, श्रीराम सोसायटी संचालक सविता रणदिवे, शीतल पाटील, पूनम पाटील, पद्मिनी माने, वंदना खोत, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.