म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती : आमदार प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघात जनतेला आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध व्हावी. जनतेचे आरोग्य सशक्त व्हावे यादृष्टीने प्रचंड काम उभे करण्याचे कार्य करण्यात येत आहे. याच आरोग्यक्रांतीच्या वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणजे म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते. प्रकाश आबिटकर म्हणाले म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती झाली आहे.

 

म्हासुर्ली पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न मिटला आहे. 4 कोटी 80 लाख निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली असून जनतेचे आरोग्यहित या माध्यमातून साधले जाणार आहे.