कोल्हापूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाच्या वतीने पंचतत्वावर आधारित राबवण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली आली आहे.
या अभियानामध्ये 414 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था २२१८ ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. यामध्ये नागरी भागात इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज आणि पन्हाळा यांनी यश मिळवले आहे.
ग्रामपंचायत विभागामध्ये धरणगुत्ती (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीने पाच ते दहा हजार लोकसंख्या गटात राज्यस्तरावरील 75 लाखांचे तर शेळकेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायत ने 1500 पेक्षा कमी लोकसंख्या गटात 50 लाखांचे राज्यस्तरावरील उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावला आहे. याशिवाय पुणे विभागात अंबप(ता.हातकणंगले) ग्रामपंचायतीने 50 लाखांचे तर 1500 ते 2500 लोकसंख्या मध्ये अर्जुनी (ता.कागल) ग्रामपंचायत विभागाने तृतीय क्रमांक मिळून 15 लाखांचे बक्षीस पटकावले आहे.