आमदार सतेज पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख आहे : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत अकॅडमीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार सतेज पाटील हे दुःखी आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात महायुती सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला.

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील, हा सतेज पाटील यांचा भ्रम आहे. महाराष्ट्रात महायुतीला यश मिळणार आहे. महायुतीतील तीन पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार असल्यामुळे जागा वाटपाबाबत कोणताही वाद नाही. महायुतीमधील तिन्ही पक्ष एकसंथपणे चांगली कामगिरी करतील. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे पाटील यांचा भ्रमनिराश होणार आहे.

गेले 40 वर्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही काम केले आहे. या कालावधीत त्यांच्या सुख दुःखात आम्ही सामील झालो. त्यामुळे व्यक्तीला समोर करून बोलणे चुकीचे आहे. सावज आता आपल्या टप्प्यात आला आहे, असा पलटवार मंत्री मुश्रीफ यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्यावर केला.