सासू सासऱ्यांकडून जावयाचा खून ;

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय35,रा.चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली होती. या खुनाचा उलगडा झाला असून संदीप च्या सासू सासऱ्यांनी वारंवार मुलीला त्रास देत असल्याच्या कारणातून हा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्या दोघांनी तिथून पळ काढला . पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी हनुमंताप्पा यल्लाप्पा काळे (49) गौरा हनुमंताप्पा काळे(45,रा. भडगाव,गडहिंग्लज ,मुळ नायनगर,ता.बैलहोंगल,जि.बेळगाव) यांना अटक केली आहे.

मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीप शिरगावला बेशुद्ध अवस्थेतमध्ये बसस्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवतात दिसून आले, यावेळी मृतदेह टाकून पोबारा करणारे मृताचे सासू-सासरा असल्याचे समोर आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले होते .

मिळालेली माहिती अशी, मृत संदीप खासगी चालक होता. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन वारंवार पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर पत्नी माहेरी गेली होती. चार दिवसांपूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला. तिथे सासू-सासरे त्याची समजूत घातली. मुलीला काही दिवसांनी पाठवतो असे सांगून संदीपला माघारी पाठवले. परंतु तो परत पत्नीच्या घरी गेला. त्यामुळे पुन्हा वाद झाला संदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सासू आणि सासरा  यांनी त्याला कोल्हापुरात सोडून येतो असे मुलीला सांगितले. गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवाशाची एसटी तिकीट काढलीत प्रवासात संदीप शेवटच्या सीटवर बसला होता, एसटी विनावाहक असल्याने या तिघासह केवळ पाचच प्रवासी बसमध्ये होते. तिघामध्ये पुन्हा वाद झाला एसटी कागल जवळ आली असताना हनुमंता आप्पा व गौरा यांनी संदीपच्या बॅगेतील नाड्यांनी त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो आजारी असल्याचा बहाना करून मृतदेह मध्यवर्ती बस स्थानक आवारातील एसटी प्रोविजन दुकानाच्या कट्ट्यावर ठेवला. त्यानंतर ते दोघे गडहिंग्लजला निघून गेले. गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण याच्या पथकाने संशयिताचा शोध सुरू होता. सायंकाळच्या सुमारास दोघांना ताब्यात घेण्यात आले.

🤙 8080365706