कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भिंती चित्र रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजले पासून संपूर्ण दिवस घेण्यात येणार आहे.
यामध्ये शिवाजी विद्यापीठ कंपौड वॉल, केएसबीपी चौक ते सायबर चौक ते एन.सी.सी.भवन या ठिकाणी असलेल्या कंपौडवॉलवर या चित्रकलेच्या स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्वच्छता ही सेवा, स्वच्छ सर्व्हेक्षण 2024, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, प्लॅस्टिक बंदी जनजागृती, 3R- Reducing, Reusing & Recycling Waste, क्रिडाविषयक जनजागृती व कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळे असे 7 विषयांवर हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या कलाकारास प्रथम क्रमांकासाठी 25 हजार व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 20 हजार व प्रशस्तीपत्र तृतीय क्रमांकासाठी 15 हजार व प्रशस्तीपत्र तसेच 3 उत्तेजनार्थींना रु.5 हजार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याऱ्या सर्व स्पर्धेकांना महापालिकेच्यावतीने सहभागाबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
या स्पर्धेत स्पर्धकांनी नेमुन दिलेल्या 30 X 10 च्या जागेत वॉल पेटींग करणे आवश्यक आहे. स्पर्धेकांनी येताना रंग व इतर साहित्य स्वत:चे आणावे, भिंतीवर प्रायमर (पांढरा रंग) महापालिकेकडून करुन दिला जाणार आहे. या पेंटींगचे तज्ञ कला शिक्षकांमार्फत परिक्षण व समितीच्यावतीने मुल्यांकन केले जाणार आहे. या स्पर्धेतील मुल्यांकनाचा समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेकांनी नांव नोंदणीसाठी व इतर माहितीसाठी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सहा.आरोग्य निरिक्षक विनोद कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या या भिंती चित्र रंगविणे स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.