रायगड : परखंदे (ता.खालापूर) येथील एका मुलीने स्वत:च्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केला.संगीता झोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याबाबत भारती झोरे (20)आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली.
संगीता यानी पहाटे आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते .यानंतर भारतीने प्रियकरासोबत तिच्या आईचा गळा आवळुन जीव घेतला.यानंतर दोघांनी मिळुन मृतदेह छताच्या पाईपला लटकवला. त्यानंतर संगीता यानी आत्महत्या केल्याची माहिती दिली.मात्रहे दृश्य धाकट्या बहिणीने पाहिल्यामुळे ही घटना उघडकीस आली.यानंतर खालपूर पोलिसांनी भारती आणि संतोषला अटक केली.