राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा : रामदास आठवले यांची केंद्र सरकारकडे मागणी ;

मुंबई: राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कठोर भूमिका घेतली आहे.रामदास आठवले म्हणाले की, “अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे त्यांचा पासपोर्ट रद्द करावा” अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

रामदास आठवले डहाणू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या निमित्ताने आले होते. यावेळी या शिबिरामध्ये अपंग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणाचे वितरण करण्यात आले.