कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष आणि जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्तावित असलेल्या
राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून या मंजुरीचे पत्र मंगळवारी प्राप्त झाले, यावेळी कार्यकर्त्यांनी संजय यड्रावकर यांचे अभिनंदन केले, फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.