कोल्हापूर – पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबर पासून धावणार

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी वंदे भारत ची मागणी पूर्ण झाली आहे. 16 सप्टेंबर पासून कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत धावणार आहे. पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता.

 

त्यानंतर कोल्हापूर सांगली सह कर्नाटकामधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा कंदील दिला. येत्या सोमवारपासून म्हणजे 16 सप्टेंबर पासून वंदे भारत धावणार आहे.