कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
हेर्ले येथील ओंकार दादासो खुरपे (वय 23 वर्ष)याचा विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, ओंकार याच्या नविन घराचे काम सुरु आहे. घरासाठी काढलेल्या खड्डयातील साठलेले पाणी काढण्यासाठी ओंकारने विजेची मोटार सुरु केली असता त्या खड्डयातील पाण्यामध्ये वीज उतरल्या मुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसला.
यामुळे ओंकार जागेवर कोसळला.हे घरातील नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याने त्यानी ओंकार ला तात्काळ कोल्हापुर येथील सी.पी.आर. येथे दाखल केले. डॉक्टरांनी ओंकारला तपासणी करून मृत घोषित केले.यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.