कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच प्रामाणिकपणे कर्ज फेडतो अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ ,बाजार समिती सभापती प्रवीण सिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, नवीन मुश्रीफ, अमरीन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विलास गाताडे ,वसंतराव धुरे, सतीश पाटील, सुधीर देसाई ,चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते.