पेठ : कार्यकालांतील पाच वर्षापैकी कोरोना मुळे तीन वर्षे निधीच नसतानाही उपलब्ध झालेल्या उर्वरीत दोन वर्षात खा. धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसंघासाठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिला आहे. येणाऱ्या काळांत आणखीन निधी आणून परिसराचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर धैर्यशील माने यांच्यासारखाच अभ्यासू व धडपडणारा खासदार संसदेत असणे गरजेचे आहे . त्यामुळे खा. माने यांच्या विजयांसाठी सर्वांनी कोणतीही कसूर न ठेवता जातीनिशी प्रयत्न करण्याचे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहूल महाडीक यांनी केले .
नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुल पेठ नाका येथे आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते, संकुलातील सर्व कर्मचारी यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते .
या बैठकीला शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख,व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बैठकीला ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील, माजी नगरसेवक सतीशदादा महाडीक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी, माजी नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक अमोल पडळकर, महाडीक युवाशक्ती अध्यक्ष सुजित थोरात, संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी, महाडिक क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आर एम बागडी, महाडीक क्रेडिट सोसायटी संचालक रवींद्र आडमुठे, संचालक सागर कोरूचे , निवास पाटील, रविंद्र पाटील, भानुदास मोठे सर, संतोष साटपे, सत्यवान रासकर, सुशील सावंत, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ पाटील मधु डिसले, संदीप पाटील, अभिजीत घारे, संदीप पाटोळे, चंद्रकात रसाळ, लव्हाजी देशमुख, रमेश पाटील, युवराज कदम, शहाजी माने, नामदेव जाधव, सूरज मोरे, विनायक जाधव, रवि गुरव, जकी फकीर, तुकाराम खटावकर, चेतन मगर, पोपट देसाई, यांच्यासह मतदार संघात येणारे प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.