कोल्हापुरात शनिवारी अवकाळी पावसाची हजेरी

कोल्हापुर : रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. पण हवेत उष्णता जाणवत होती. लोकं गर्मीने हैराण झाले होते.

दरम्यान शनिवारी दुपारी आभाळ भरून आले आणि शहरात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री को;कोल्हापुरात २ तास जोरदार पाऊस झाला होता . पण काल पावसाने उसंत घेतल्याची पाहायला मिळाले. दरम्यान आज शनिवारी दुपारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.