खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा इस्लामपूर विधानसभेमध्ये झंझावती दौरा

आष्टा प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक- २०२४ च्या प्रश्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा), हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांनी आष्टा शहर बावची जिल्हा परिषद मतदार संघ व बागणी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विविध ठिकाणी बैठका घेऊन भाजपाचे बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वाॅरीयर्स, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

यावेळी ‘तिसरी बार मोदी सरकार’, असा निर्धार करुन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना बहुमतांनी विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन ना.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. तसेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटण्याचा कानमंत्र ही दिला.

यावेळी निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली अगली बार ४०० पार, मोदी सरकार व महासत्ताचे स्वप्न साकार करण्यासाठी हातकणंगले मतदार संघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.चंद्रकांतदादा पाटील यांना दिला.

यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार (भैय्या), हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) आनंदराव पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,भाजपा तालुकाध्यक्ष निवास पाटील, प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सतीश बापट, आष्टा शहराध्यक्ष उदय कवठेकर, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव अनुप वाडेकर, आष्टा शहर युवक अध्यक्ष अरबाज मुजावर, आष्टा शहर उपाध्यक्ष जयंवत खोत, शिवसेना आष्टा शहर अध्यक्ष वीर कुदळे, मनसे चे वाळवा तालुका अध्यक्ष सनी खराडे,प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील, वाळवा तालुका कोषाध्यक्ष रणजित माने , अल्पसंख्याक आघाडीचे वाहिद मुजावर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनिकेत पाटील, संघटन सरचिटणीस विश्वजीत पाटील, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरव, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक प्रकाश जाधव, नागावचे उपसरपंच रणजित मगर, चेअरमन संतोष जाधव, मिरजवाडीचे सरपंच जयश्री सांळुखे, कारंदवाडीच्या उपसरपंच रुपाली सावंत, सचिन लोढे, भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत, शिगांवचे माजी सरपंच उत्तम गावडे, आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.