एफ आर पी केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे मिळते कोणाच्या आंदोलनाने नाही. खा धैर्यशील माने

कोण लोकांना फसवत असेल की मी आंदोलन करून उसाला एफ आर पी मिळवून दिली एफ आर पी केंद्रातील झालेल्या निर्णयामुळे हा कायदा झाला आहे यामुळे हा कायदा पूर्ण देशात आहे त्यामुळे ऊसाला मिळणारी ही एफआरपी कोणाच्या आंदोलनामुळे नाही तर केंद्रामुळे शेतकऱ्यांना ऊसाची एफ आर पी मिळत आहे अशी टीका खा. धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेता शुक्रवारी कुरुंदवाड येथे शिरोळ तालुका महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केली

यावेळीमाजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, डॉ संजय पाटील प्रमुख उपस्थितीत होते हा मेळावा येथील अमन हॉल येथे संपन्न झाला.

स्वागत मेजर सुनील पाटील यांनी केले पुढे बोलताना खा. माने म्हणाले कोट्यावधी रुपयाचा विकास निधी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मी आणला आहे मागील वेळी जनतेने मला शिवसेना भाजपाचा उमेदवार म्हणून निवडून दिले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो यावेळी ही मी शिवसेना भाजपाचा उमेदवार असल्यामुळे जनतेचे गद्दार कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी गेल्यावेळी प्रमाणे मला यावेळीही खासदार बनवावे अशी मागणी उपस्थित जनतेसमोर खा माने यांनी केली यावेळी बोलताना डॉ संजय पाटील म्हणाले राजू शेट्टी यांना शब्द देणारे आता त्यांच्यासोबत नाहीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी हे कोणाचे पोलिंग एजंट होते ते सर्वांना माहीत आहेत ते आता कोणासोबत आहे हेही जनतेच्या समोर आले आहेत यामुळे मात्र खा माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो शब्द दिला तो पाळला आहे भाजपने सांगितले आहे शब्द दिला तो पाळा जयसिंगपूरच्या मेळाव्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी गणपतराव पाटील यांना म्हणाले गणपत दादा तुम्ही भिऊ नका तुमच्या दोन्ही बाजूला मी आणि जयंत पाटील कवच कुंडले आहेत. तुम्हाला एकच सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना अंगावर घेऊ नका तुमच्याही संस्था मोठे आहेत येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीच व गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह होणार आहे याचे भान ठेवावे अशी टीका संजय पाटील यांनी बंटी पाटील यांच्यावर केली हातकलंगले लोकसभा मतदार संघामध्ये पाच काय सात उमेदवार उभे राहू दे याचा काहीही फरक आमच्या खा माने यांना पडणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मिश्रीलाल जाजू ,अँड सुशांत पाटील, सतीश मलमे, चंद्रकांत मोरे, सोमेश गवळी, हरिभाऊ पाटील, बशीर फकीर, आमगोंडा पाटील, चिमासो पाटील, खुशाल कांबळे, यांच्यासह शिरोळ तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते