अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास नागरिकांचा बेदम चोप

साळवण : प्रतिनिध
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय नराधमास स्थानिक नागरिकांनी बेदम चोप देवून गगनबावडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
या बाबत गगनबावडा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार एस के लिंगदळी, ता. सुरपूर जि. यादगिरी (कर्नाटक) येथून रोजंदारीच्या कामासाठी निवडे (ता. गगनबावडा) येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीस खाऊला पैसे देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न वेसर्डे (ता गगनबावडा) येथील बळीराम आबा कांबळे या ६० वर्षीय नराधमाने करण्यात आला.
शेजारी खेळणाऱ्या मुलाने आरडाओरडा केल्याने रस्त्यावर असणाऱ्या तरुणांनी घटनास्थळावर धाव घेवून या मुलीची सुटका केली. हि घटना कळताच जमलेल्या जमावाने या नरादमास बेदम चोप देवून गगनबावडा पोलिसांच्या हवाली केले.
संबंधित संशियीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुलीचा प्राथमिक वैधकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती गगनबावडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी दिली.