कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) मार्फत महाशिवरात्री निमित्त मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी दुधाचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संघाचे संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
महाशिवरात्री निमित्या अनेक भाविक भक्त भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात जात असतात. या महाशिवरात्रीचे औचित्य साधून आज भाविक भक्तांना उत्सव मूर्तीच्या दुग्धाभिषेक साठी गोकुळच्या वतीने ठिकठिकाणी महादेव मंदिरामध्ये मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच गोकुळची बासुंदी सवलतीच्या दरात देण्यात आली. यामध्ये क.बीड येथील महादेव मंदिरामध्ये जेष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच शिवाजी स्टेडियम येथील रावणेश्वर मंदिरामध्ये संचालक अजित नरके यांच्या हस्ते व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दूध वाटप करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला.
तसेच उत्तरेश्वर मंदिर-उत्तरेश्वर पेठ,कोल्हापूर, स्वयंभू महादेव मंदिर घोटवडे, महादेव मंदिर- वडणगे, रत्नेश्वर मंदिर –कराड, कपिलेश्वर मंदिर –बेळगाव, ओंकारेश्वर मंदिर –पुणे, व्हटेश्वर मंदिर –आळंदी येथील मंदिरामध्ये गोकुळ मार्फत दूध वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके,सहा.महाव्यवस्थापक (मार्केटिंग) जगदीश पाटील, मार्केटिंग प्रमुख हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते .