बदाम दुधाचे फायदे

बदाम ज्याप्रमाणे शरीरासाठी उपयोगी असतात त्याचप्रमाणे बदामाचे दूध देखील खूप उपयोगी असते. तर जाणून घेऊयात बदामाच्या दुधाचे फायदे.

बदामाचे दूध प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. बदामाच्या दुधात असणारे व्हिटॅमिन-डी त्वचेचा सुर्याच्या अतिनील किरणांपासून आणि हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव करते तर व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेला एक प्रकारचे संरक्षण कवच प्राप्त होते.

बदामाचे दूध डोळांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.

केसांसाठी बदाम जसे फायदेशीर असतात तसेच निरोगी आणि लांब केंसासाठी बदामाचे दूध खूप फायदेशीर ठरू शकते.

बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम आढळते. त्यामुळे हे दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि हाडांचा विकास होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदामाचे दुध मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.