निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड कधी?: संजय राऊत

पुणे: पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला आहे.

निखिल वागळेंवर हल्ला करणारे कोण गुंड आहेत? कोणत्या पक्षाचे गुंड आहेत हे? ‘डर गये कमिश्नर’ परेड तर त्यांची व्हायला पाहिजे होती. निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचे समर्थन करत आहेत. या हल्ला करणाऱ्यांची देखील परेड काढली पाहिजे. त्यांनाही हातात बेड्या घालून रस्त्यावर फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते, असा घणाघात त्यांनी केला आहे.

🤙 8080365706