कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने सम्राटनगर येथे आयोजित हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव होत्या. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रेमला पंडितराव जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
सम्राटनगर मधील जिव्हेश्वर हॉल येथे आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा या अतिशय रंगतदार झालेल्या स्पर्धेत आरती दळवी या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर शितल गायकवाड व रुपा गोविंनअप्पा या अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या. आमदार जयश्री जाधव, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.
महिलांचा सन्मान करून, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन विविध उपक्रम राबवते. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. दश्मिता जाधव यांनी सांगितले.
स्त्रियांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिलं तर त्या स्वावलंबी होतील, आत्मनिर्भर होतील असा विश्वास गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी व्यक्त केले.
महिला व मुलींनी जीवनात कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना माघार घेऊ नका. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवा असे आवाहन शिवशक्ती एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका शिवानी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
अनेक महिला स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाच्या शोधात आहेत. अशा अनेक महिलांसाठी जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे, असे मत शैला टोपकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मंजिरी केसकर, वर्षाराणी उगले, प्रांजल मोरे यांची भाषणे झाली. महिला काँग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे,
सई साळोखे, स्वरुपा कृझ, वंदना दुधाणे, सुनीता हुंबे, चंदा बेलेकर, रश्मी भोसले, दिपाली फरडे, शुभांगी स्वयम, ज्योती दुधाणे, प्रिया दुधाणे, शुभांगी पाटील, माधुरी काजवे, स्वप्ना गाटे, रिचा सुर्यवंशी, शुभदा जगदाळे, स्वाती देसाई, समीक्षा पाटील, दिपाली पवार, स्मिता मांडरे, गीतांजली काटकर, जिज्ञासा दुधगीकर, शुभांगी इंगळे, श्रुती घोटणे, अनुष्का घोटणे, माधुरी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांच्या साठी घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेते असे : रसिका नलवडे,आदिती धर्माधिकारी, अस्मिता अथणे, नीता नाईक, सुवर्णा औंधकर, बबीता मिसाळ, अश्विनी कदम, सपना शिंदे.