श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन…..

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी म्हाळुंगे ता.करवीर येथील श्री विठू माऊली महिला भजनी मंडळाचे भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

      यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्य सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही. मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.प्रकाश सोळोखे, एस.आर.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.