उत्स्फूर्त गर्दीत समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस साजरा

कागल (प्रतिनिधी): शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या उत्सफुर्त गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.आज (शुक्रवारी) सकाळी गडहिंग्लज गणेश हॉल, गांधीनगर येथे तर कागलमध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून श्रीराम मंदिर,खर्डेकर चौक येथे त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

शुभेच्छा स्विकारण्यापूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी आडीचे परमात्मा राजीवजी महाराज,हत्तरगी मठाचे आनंद गोस्वामी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांमध्ये खासदार धनंजय महाडिक,खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार पी एन पाटील, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई,राजवर्धन नाईक महानगर अध्यक्ष विजय जाधव,नाना कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे मंडलिक कारखान्याचे संचालक, सत्यजित पाटील, महेश घाटगे, कैलास जाधव, भरत पाटील, करवीर पंचायत समिती माजी सभापती सावित्री पाटील, राजे बॅंक चेअरमन एम पी पाटील, रमेश माळी,भगवान काटे, मयुर उद्योग समुहाचे डॉ.संजय पाटील, उद्योगपती शेखर चौगले, शशिकांत खोत, हंबीरराव पाटील, माजी महापौर सुनील कदम , कोल्हापूर महानगर चे अध्यक्ष विजय जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, क्रांती पोवार पाटील,
यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. घाटगे यांनी पुस्तके वह्या व रुमाल बुके स्वरूपात शुभेच्छा स्विकारल्या.

यांनी दिल्या दूरध्वनीवरून शुभेच्छा

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, डॉ. भारती पवार,डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री चंद्रकांतदादा खासदार प्रा संजय मंडलिक आमदार प्रकाश आबिटकर , शिवाजीराव पाटील चंदगड, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील,भगवानराव घाटगे

शहरासह गावोगावी विविध उपक्रम

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने कागल शहरासह तालूक्यात गावोगावी रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, विविध स्पर्धा , स्नेहभोजन, रुग्णांना फळे वाटप , हळदी-कुंकू, कीर्तन, व्याख्यान, ऊसतोडणी कामगार यांच्या मुलांना खाऊ वाटप, मूकबधिर मुलांना भोजन वाटप , शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप,

अशा विविध उपक्रमांचे नागरिकांनी उत्सफुर्तपणे आयोजन केले. राजमाता जिजाऊ महिला समिती,फळे व भाजीपाला विक्रेत्या महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनेही श्री.घाटगे यांचा वाढदिवस साजरा केला. म्हाकवे येथील कार्यकर्त्यांनी एक्केचाळीस किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला.