बालचमुसोबत राजे समरजितसिंह घाटगे यांनी साजरा केला वाढदिवस….

कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस नव – नवीन उपक्रमांनी साजरा होत आहे.याचाच एक भाग म्हणून त्यांचे चिरंजीव आर्यवीर यांच्या आग्रह व बालहट्टातून श्री घाटगे यांनी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आपल्या 41 व्या वाढदिवसाची सुरवात बहुजन समाजातील बालचमुसोबत केक कापून केली.

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महा मार्गावर कोगनोळी जवळ असलेल्या विराज जंक्शन येथील मॅकडॉनल्ड्स मध्ये सायंकाळच्या वेळेत संगीतमय वातावरणात वाढदिवसाच्या कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राजे समरर्जीतसिंह घाटगे व युवराज आर्यविर घाटगे यांचे सोबत उपस्थित सर्व मुलांनी पिझ्झा, बर्गर, बरोबर ज्यूस अशा मेजवानीचा आनंद लुटला व उपस्थित बालचमुनी केक कापून श्री घाटगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या नावीन्यपूर्ण कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी उपस्थित पालक वैशाली आंबी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, आमच्या कागल मधील मुलाच्यासमवेत राजे साहेबांनी आपला वाढदिवस साजरा केला. सोबत आर्यवीर राजे असल्यामुळे मुलेही खूप आनंदित होती.पालक म्हणून आम्हालाही खूप छान वाटले