पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ; मालदीवच्या राजदूतना समन्स…

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्‍या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना समन्स बजावले.आज (दि.८) मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब परराष्ट्र मंत्रालयात आले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते येथून निघून गेले. दरम्‍यान, पंतप्रधान मोदी आणि भारताविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्‍या प्रकरणी मालदीवने 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे केले होते. यानंतर मालदीवच्या उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, या ट्विटवर टीका झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा भारतीयांनी तीव्र निषेध केला. रविवारी सोशल मीडियावर भारतीय नेटकर्‍यांकडून मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी दावा केला की, त्यांनी मालदीवची सहल रद्द केल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील लक्षद्वीपला पर्यायी पर्यटनस्थळ म्हणून निवड केल्‍याचे सांगितले. आज भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते येथून निघून गेले.

भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे निवेदन जारी केले, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर कारवाई करत मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना तसेच मलशा शरीफ आणि महजूम मजीद यांना पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निलंबित केले. मालदीव सरकारचे प्रवक्ते, मंत्री इब्राहिम खलील यांनी म्‍हटलं होते की, वादग्रस्त टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.