तालुकास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत वेतवडे शाळेचे धवल यश


साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
गगनबावडा तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात कोदे बुद्रुक येथे पार पडल्या. शिक्षण विभाग पंचायत समिती गगनबावडा यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुकास्तरीय संपन्न झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत समूहगीत प्रकारात लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सांघिक खेळात खो-खो लहान गट मुले व मुली प्रथम क्रमांक, मोठा गट मुले व मुली द्वितीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक स्पर्धेत ६०० मीटर धावणे समृद्धी संभाजी मोरे प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक संभव एकनाथ मोरे, तृतीय क्रमांक स्वरूप संदीप गुंजवटे, ५० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक समृद्धी शिवाजी शिंदे, १०० मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक संभव एकनाथ मोरे, १०० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक समृद्धी शिवाजी शिंदे, द्वितीय क्रमांक स्नेहल अनिल भोसले, तृतीय क्रमांक श्रुतिका एकनाथ जाधव, लांब उडी मुले द्वितीय क्रमांक स्वरूप संदीप गुंजवटे, तृतीय क्रमांक संभव एकनाथ मोरे, लांब उडी मुली प्रथम क्रमांक आरोही भिकाजी सावंत, कुस्ती द्वितीय क्रमांक श्रुतिका एकनाथ जाधव, कुस्ती मुले (२५ किलो गट) प्रथम क्रमांक शंभूराजे सावंत, कुस्ती मुली (२५ किलो गट) प्रथम आराध्या शरद शिंदे, मुली (३०किलो गट) वेदिका संभाजी शिंदे प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

खेळाडूना गटशिक्षणाधिकारी कुंभार, केंद्र प्रमुख गांगुर्डे, मुख्याध्यापक क्रांतिसिंह सावंत, बालाजी कोपरकर, लिंबाळकर, जाधव, शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 9921334545