तसं तर घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. एवढचं नव्हे तर घाम येणं हे एक निरोगी असल्याचं लक्षण आहे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे घाम येणं, तसचं एखादं कष्टाचं काम, वर्कआऊट करताना घाम येणं अगदी सामान्य गोष्ट आहे.घाम आल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते.
परंतु जास्त घाम येणे आरोग्यासाठी चांगले नाही. थंडीच्या दिवसात घाम येणं हे आरोग्यासाठी धोक्याचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही रात्रीही झोपेत घामाने भिजत असाल तर ते तुमच्यासाठी हेल्थ अलर्ट असू शकते.
खरं तर, रात्री अचानक घाम येणे हे अनेक शारीरिक समस्यांचे लक्षण असू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की रात्री अचानक घाम येणे हे काही प्रकारच्या शारीरिक बदलांचे लक्षण असू शकते, तर ते काही घातक आजारांचे लक्षण देखील असू शकते. म्हणूनच, जर तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर तुम्हाला त्याचे कारण माहित असणे आवश्यक आहे.
हृदय रोग
जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचे कपडे आणि चादर घामाने भिजतात आणि त्यामुळे तुमची झोप खराब होते, त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. खरं तर, रात्री अचानक घाम येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे हे हृदयाच्या खराब आरोग्याचे लक्षण असू शकते. यासाठी, तुम्ही स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळता येतील.
कर्करोग होण्याची शक्यता
रात्री अचानक घाम येणे हे देखील कर्करोगासारख्या घातक आजाराचे लक्षण असू शकते. ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कार्सिनॉइड ट्यूमरच्या बाबतीत शरीराला जास्त घाम येतो. त्याच वेळी, ल्युकेमियासारख्या ब्लड कॅन्सरच्या घातक प्रकरणांमध्ये, व्यक्तीला रात्री खूप घाम येतो. त्यामुळे चुकूनही हलक्यात घेऊ नका.
संसर्गजन्य रोग
एखादा आजार झाल्यास शरीरातून जास्त घाम येण्याची समस्या देखील उद्भवते. संसर्गाच्या काळात, शरीर रोगाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि अशा स्थितीत शरीराला वेगाने घाम येतो. जर तुम्हाला सर्दी आणि खोकला यांसारख्या सामान्य संसर्गामुळे त्रास होत असेल तर तुम्हला काळजी करण्याची गरज नाही. पण जर ही समस्या दीर्घकाळ राहिली, तर तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे की तुम्हाला कोणत्याही गंभीर संसर्गजन्य रोगाने ग्रासले आहे का?
लो ब्लड शुगर
लो ब्लड शुगर झाल्यास जास्त घाम येण्याची समस्या असते. त्यामुळे रात्री झोपताना तुम्हाला विनाकारण घाम येत असेल तर तुम्ही तुमची साखरेची पातळी निश्चितपणे तपासली पाहिजे. हायपोग्लायसेमियामुळे म्हणजेच शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी झाल्यामुळे शरीराला वेगाने घाम येतो. मात्र, त्यावर वेळीच उपचार न केल्यास बेशुद्धावस्था आणि झटके येऊ शकतात.
मेनोपॉज
रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना जास्त घाम येण्याची समस्या भेडसावते. रजोनिवृत्ती दरम्यान, शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे शरीराला असामान्यपणे घाम येतो.