कोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर परिसरातील बेकरी व्यवसायिकाने, खाद्यपदार्थ फुकट न दिल्याच्या रागातून, दोघांनी केलेल्या जबर मारहाणीतील गंभीर जखमी शिवकुमार बघेल यांचा उपचार सुरू असताना आज ,(सोमवारी) मॄत्यू झाला. दोघांनी त्यांना फरशीवर डोके आपटून जखमी केलं होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शिवकुमार बघेल हे यादवनगर परिसरात कुटुंबियसमवेत राहत होते. त्यांच्या घराशेजारी त्यांची श्रीराम स्वीट मार्ट बेकरी आहे. गुरूवारी २८ रोजी दुपारी यादवनगर परिसरातील राहणाऱ्या प्रथमेश शिंदे आणि दिलीप पाटील यांनी बेकरीतील खाद्यपदार्थ फुकट खायला देत नसल्याच्या रागातून शिवकुमार बघेल या बेकरी व्यावसायिकाला घरात घुसून दोघांनी बेदम मारहाण केली होती.
यावेळी त्या दोघांनी शिवकुमार बघेल यांचे डोके जमिनीवर आपटून जखमी केलं होते.
या प्रकरणी शिवकुमार बघेल याची पत्नी निर्मला बघेल यांच्या फिर्यादीवरून दोघां विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. राजारापुरी पोलिसांनी प्रथमेश शिंदे आणि दिलीप पाटील यांना ताब्यात घेतलं असून दोघे संशयित सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
