थुंकीमुक्त कोल्हापूर, नववर्षाचा संकल्प..-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याने रोगराई पसरते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. तरीही नागरिकांची थुंकण्याची सवय काही गेलेली नाही.अशा थुंकीचंदांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न अँटीस्पिटिंग कोल्हापूर ही चळवळ गेले तीन वर्षापासून करत आहे. चळवळीद्वारे प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांना अनेकदा, दंडनीय व कठोर कारवाई व्हावी याकरता निवेदने सुद्धा दिली गेली. पण तरीही बळ मिळत नसल्याने आज सरत्या वर्षाला निरोप देताना पुढील वर्षी कोल्हापूर निरोगी आणि थुंकीमुक्त करण्यासाठी चळवळ व्यापक करण्याचा संकल्प म.ताराराणी चौकात केला गेला.

“आपली शाहूनगरी, करू थुंकी मुक्त आणि निरोगी”, “थुंकी चंदांचा निषेध असो”, “खा मावा ,मोज घटका”, “काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही” अशा घोषणा देत रस्त्यावर थुंकणारी व्यक्ती आढळल्यास तिला स्वच्छता करायला भाग पाडून सार्वजनिक स्वच्छतेसाठी शपथ घ्यावयास लावली. तसेच प्रबोधन पर फलक दुकानांमध्ये चिकटवण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन दीपा शिपुरकर ,राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सागर बकरे यांनी केले.सारिका बकरे, ललिता गांधी, नीना जोशी ,सुधीर हंजे, मोहन सातपुते, मयूर गोवावाला, अमरदीप पाटील, भानुदास डोईफोडे, प्रसाद नरुले, संघसेन जगतकर,डॉ. देवेंद्र रासकर, अनिल कांझर, डॉ. तृप्ती करेकट्टी, दिपाली जाधव ,सुरज मोहिते, सुजाता पाटील यांचा उपक्रमास सक्रिय सहभाग होता. कृष्णा गांधी,सार्थ करेकट्टी, नारायणी जाधव ही छोटी मुलेही स्वच्छतेचा संदेश द्यायला पुढे सरसावली होती. प्रशांत पितालिया ,अभी जाधव, अरुण कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706