दोनवडे : श्रीकांत पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील व करवीर पश्चिम भागातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असणारी कुडीत्रे येथील यशवंत बँकेच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अडीचशे कोटी रुपयाची उलाढाल असलेल्या या संस्थेच्या सत्तेवर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतिम टप्प्यात बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. आता बँकेवर कोण अधिराज्य गाजवणार आणि सभासद सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सद्यस्थितीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल बांधणी झाली आहे. प्रकाश देसाई, अमर पाटील यांनीही पॅनल बांधण्याची सुरुवात केली आहे यामध्ये चंद्रदीप नरके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे नरके कोणाला पाठिंबा देणार यावर सगळे गणित अवलंबून आहे. आज सोमवारी दोन्ही पॅनलची यादी जाहीर होणार आहे. .
यशवंत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार पी एन पाटील यांच्यासोबत प्रकाश देसाई, एकनाथ पाटील, अमर पाटील यांनी एकत्रित बैठक घेऊन प्रयत्न केले होते. पण काही कारणास्तव यांची चर्चा फिसकटली त्यामुळे बँकेची बिनविरोधची शक्यता मावळली. आता दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके या तिघांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. या नेत्यांवर सध्याचे सत्तेचे गणित ठरणार आहे. बँकेत झालेली नोकरभरती यावरूनही असंतोष आहे. एवढ्या मोठ्या वित्तीय संस्थेवर कोणाचा हक्क राहणार याची उत्सुकता मात्र सभासदांना लागली आहे.
अध्यक्षपदासाठी चुरस
बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सात वर्षे अध्यक्षपद सांभाळले आहे. प्रकाश देसाई यांनी सहा वर्षे पदाची धुरा सांभाळली आहे. संस्थापक शंकरराव पाटील-शिंगणापूरकर त्यांच्या पत्नी दोन वर्ष अध्यक्षपदी होत्या. सध्या फक्त अध्यक्षपदावरून निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील अमर पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष यांच्या घरात अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले असल्याचे अधिकृत रित्या समजते आहे.
बिनविरोध होण्याची शक्यता?
यशवंत बँकेच्या कोल्हापूर जिल्ह्यात तेरा शाखा आहेत बँकेची अडीचशे कोटींची उलाढाल आहे यशवंत बँकेमध्ये आजपर्यंत सर्वच पक्षांचे प्रॉब्लेम राहिले आहे आणि सर्वच पक्ष यामध्ये आहेत बँक सध्या नावारूपाला आली आहे सर्व सभासदांमध्ये बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांचेही म्हणणे मान्य केले आहे. पण अंतिम टप्प्यात समझोता नाही झाला तर बिनविरोधची शक्यता कमी आहे.
