सरवडे (प्रतिनिधी) : कारखाना हा आपलीच मालकीचा आहे या अविर्भावात बिद्री कारखान्याची गेली अनेक वर्षे सत्ता भोगणारया के.पी.पाटील यांनी खोटे बोलं पण रेटुन बोल या प्रवृत्तीचा वापर करीत सभासदांची फसवणूक करुन कारखान्याची लुट केली आहे. त्यामुळेच या भोगसगिरीच्या विरोधात आणि स्वाभिमानासाठी कार्यक्षेत्रातील तमाम सभासदांच्या पाठबळावर ही निवडणूक जिंकण्यासाठीच बिद्रीच्या मैदानात उतरलो आहे. भविष्यात अनेक कल्याणकारी योजना राबवून सभासदाभिमूख कारभार करीत सामान्य सभासदांच्या जीवनात नंदनवन फुलविणार असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी व्यक्त केले ते कसबा वाळवे, ता.राधानगरी येथे परिर्वतन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना ए.वाय.पाटील म्हणाले, माती परीक्षण आणि एकरी उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. कारखान्याच्या महाविद्यालयात शेतकरी कुटुंबातील विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण शिवाय अद्यावत शिक्षणाची सोय करण्यासाठी आम्ही सर्व नेते प्रयत्न करणार आहोत, उशिरा येणाऱ्या उसाला सानुग्रह अनुदान देऊन, कारखाना कार्यक्षेत्रातील पाणंद रस्ते दुरुस्त व मजबूत करणार आहे., मातीपरीक्षण करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार असे सभासदांच्या आर्थिक उन्नतीचे प्रभावी मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याने सर्व सभासद आमच्या परिवर्तन आघाडी सोबतच आहेत.
यावेळी बोलताना अशोक फराकटे म्हणाले की, विरोधक आमचा कारखाना लई भारी म्हणतात ,मग आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस का नेला जात नाही ? असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी मंडळींनी या परिसरातील अनेक मयत सभासदांच्या नावावरील शेअर्स जाणीवपूर्वक त्यांच्या वारसांच्या नावे ट्रान्सफार केले नाहीत. मागील 5 वर्षे के.पी.पाटील हे कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी इतक्या वर्षात कधी साखरेचा दर कमी केला नाही. परंतू पराभवाच्या भितीने ते साखरेचा दर कमी करत आहेत. साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा जादा दर कधीच दिला नाही. केपी यांनी लै भारी ची टिमकी वाजवली आहे. कोजन चा झालेला नफा तेवढाच कारखान्यात तोटा हे गौड बंगाल सभासदांना कळलेच नाही.सभासदांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात ढपला पाडण्याचं काम के.पी.यांनी केले आहे.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, कोकण केसरी के.जी.नांदेकर, बाबासाहेब पाटील, सरपंच वनिता पाटील, सचिन पाटील, मानसिंग पाटील, जोतीराम पाटील, जी.डी.पाटील, बाळासाहेब पाटील, प्रभाकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत श्रीकांत साळोखे यांनी केले.प्रास्तविक अशोक फराकटे यांनी केले.
+