टीईटी परीक्षेबाबत मोठा निर्णय…

मुंबई : राज्यभरात गाजलेल्या टीईटी परीक्षेबाबात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी ऑफलाइन टीईटी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारकडून IBPS या कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली.मागच्या दोन वर्षात टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होतो. परीक्षेदरम्यान घडलेला हा प्रकार पुण्यातील (Pune) होता. 

त्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलेले आहे.राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, परीक्षा मंडळे, अनुदानित, विनाअनुदानित असणारे, शाळेतील शिक्षक उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. परंतु, पुण्यात घडलेल्या गैरवर्तनामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

याबाबतीची माहिती दिली राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी, ते म्हणाले की, राज्य परीक्षा परिषदेकडून सध्या परीक्षा ऑनलाइन (Online) घेण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सरकारकडून देखील टीईटी ऑनलाइन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी बैठका आणि पत्रव्यवहार सुरु आहे.