बहिरेश्वर प्रतिनिधी…. मौजे म्हारूळ येथील सन 2020 सालची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक दुध संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी पूढाकार घेवून बिनविरोध केली होती. पाच वर्ष पाच सरपंच,चार उपसरपंच अशी रचना करून प्रत्येक गटाला सरपंच व उपसरपंच मिळावं या सूत्रानुसार ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केली .या सूत्रानुसार रोटेशन पद्धतीने विद्यमान उपसरपंच सरदार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर संत गोरा कुंभार सह दुध संस्थेचे संस्थापक राजाराम कुंभार यांचा एकच अर्ज दाखल झाला
यावेळी अध्यासी अधिकारी विद्यमान सरपंच शालाबाई गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक पी. एस .मेंगाणे यांनी त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.मावळते उपसरपंच सरदार पाटील व नूतन उपसरपंच राजाराम कुंभार यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नुतन उपसरपंच यांनी आपण गावच्या विकासासाठी अहोरात्र उपलब्ध राहू तसेच गावातील विकासकामे करण्यावर भर देवू अशी ग्वाही दिली.
यावेळी भरत सुतार, भगवान कुंभार,रवि चौगले आदींनी आपली मनोगते व्यक्त केली व नुतन उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच शालाबाई गुरव, माजी सरपंच सौ वंदना नामदेव म्हाकवेकर,माजी सरपंच सौ. रूपाली मोहन चौगले,विद्यमान सदस्य श्री.प्रकाश कांबळे ,सदस्या सौ.रेखा कुंभार,सदस्या सौ.अलका पाटील, श्री.राजाराम पाटील तसेच गावातील दूध व सेवा संस्थांचे पदाधिकारी,तरूण मंडळे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी उपसरपंच सागर चौगले यांनी आभार मानले..