आम. पी. एन. पाटील यांचे खमके नेतृत्वच कारखान्याला तारेल -शिवाजीराव पटील


कोल्हापूर (प्रतिनिधी) : पी. एन. पाटील सडोलीकर यांनी भोगावती कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी कारखान्यावर १८७ कोटी रुपये कर्ज होते . त्यावरील १३५ कोटी चे व्याज द्यावे लागले . त्यामुळे ३२२ कोटीचा बोजा घेऊन कारखाना चालवणे पोरखेळ नसून केवळ आम . पी. एन. पाटील सडोलीकर यांनीच हा कारखाना खाजगी करणापासून वाचवून शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवला आहे . आम. पाटील यांचे खमके नेतृत्वच कारखान्याला तारेल असे प्रतिपादन कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील तारळेकर यांनी केले .

कसबा तारळे येथे सत्ताधारी राजर्षि शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते . सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील हे होते . आपल्या भाषणात पुढे बोलताना कारखान्याला प्रतिटन एक हजार रुपये तोटा होत असताना ही गेल्या सहा वर्षात आ पाटील यांनी काटकसरी चा कारभार करत ऊस उत्पादक , कर्मचारी व उसतोडणी वहातुक दारांना न्याय द्यायचे काम केले आहे. मात्र विरोधकांना बोलायला तोंड नसल्याने ते खोटी व दिशाभुल करणारी टीका करत आहेत . मात्र त्यांना प्रचंड मतांनी पराभुत करून सभासद त्यांची जागा दाखवून देतील असे सांगितले .

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आ . पाटील यांनी गेली सहा वर्षे कारखाना काटकसरीने चालवून ऊसबिले व कामगार पगार दिले आहेत . जिल्हा बँकेच्या कर्जावरील व्याजात दरवर्षी ११ कोटी रुपये वाचवले आहेत . डिस्टलरी चा १३७ कोटी रुपयांचा दंड माफ करून घेतला . विरोधकांनी उपसलेल्या कर्जाचे व्याज भागवायचे काम केले . हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राखला आहे . कर्मचाऱ्यांना दोनवेळा वेतन करार लागू केले असे सांगून कारखाना बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले .तरीही विरोधक सत्तेसाठी भ्रमिष्ट होऊन बेताल आरोप करून दिशाभुल करत आहेत . भोगावती चा स्वाभिमानी सभासद त्यांना जागा दाखवून देईल असे सांगितले . धैर्यशिल पाटील यांच्या गैरकारभाराची साडेसहा कोटी रुपयांची वसुली लागली आहे . मी सहा वर्षे एक रुपया भत्ता अथवा प्रवास खर्च घेतलेला नाही .सभासदांनी विरोधकांचे डिपॉझीट जप्त केली आहे तरीही सत्तेसाठी तळमळत आहेत .

 यावेळी बोलताना क्रांतिसिंह पवार पाटील यांनी आ पी एन पाटील यांनी कारखान्यातील सर्वच घटकांचे हित जोपासले आहे त्यामुळे सभासद हितासाठी च आम्ही सर्वजण एकत्र आलो असून सभासदांनी दिशाभुलीला थारा देऊ नये असे सांगितले .

  यावेळी बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर  , गोकुळचे संचालक किसन चौगले, माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील तोडणी वहातुक संघटनेचे धनाजी कौलवकर शौकत बक्षू यांनी  विरोधकांना व्देषाने भ्रमिष्ट केले असून त्यांना स्वाभिमानी सभासद जागा दाखवून देईल असे सांगितले .
  यावेळी  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, कृष्णराव किरुळकर,गोकुळचे संचालक प्रा किसन चौगले, बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी डी धुंदरे, बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील भुयेकर, अमित कांबळे कारखान्याचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, दत्तात्रय हरी पाटील दत्तात्रय धोंडी पाटील, एकनाथ पाटील, अभिषेक डोंगळे, शशिकांत आडनाईक सरपंच सौ विमल पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आम. पाटील यांच्यामुळेच रायगड बँकेचे कर्ज! कारखान्याचा चेअरमन हा आ पाटील यांच्या सारखा खमक्याच असायला लागतो . कारण आम्ही सत्तेवर असताना रायगड बँकेने कारखान्याला कर्ज दिले नव्हते . मात्र केवळ आम. पाटील यांच्या शब्दाखातर रायगड बँकेने कर्ज दिले त्यामुळेच भोगावती च्या सभाजदा ना आधार मिळाला असे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.