सध्या एकीकडे थंडी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवळा तुमची मदत करू शकतो.आवळ्यामध्ये विटामिन सी, आयरन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात.
बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याचा रस, मुरब्बा इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात. आवळ्याचे (Amla Benefits) सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.
आवळ्यामध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात आढळून येते, जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
नियमित आवळ्याचे सेवन केल्याने तुम्ही गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.
बदलत्या वातावरणामध्ये अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित आवळ्याचे सेवन करू शकतात.
कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे या समस्यांना दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो ॲसिड आणि आवश्यक फॅटी ॲसिड आढळतात, जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या तेलाचा वापर करू शकतात. नियमित या तेलाचा वापर केल्याने केस मजबूत होतात आणि केसातील कोंडा दूर होऊ शकतो.