संभाजी राजे छत्रपती यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून.. मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुकीच सोडवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…

 कोल्हापुरात सारथीच्या विविध प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्यावर संभाजीराजे गंमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजेंचा हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावं, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत. काल (रविवारी) या आंदोलकांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. 

त्यावेळी संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. त्यावर समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा केलं आहे. या कामाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.