खुपिरेच्या बलभीम संस्थेच्या म्हणण्याचा विचार न करता लेखा परिक्षकांचा एकतर्फी अहवाल: संजय पाटील

दोनवडे प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बलभीम विकास सेवा संस्थेने सभासदांना गुळ तारण कर्जे दिली आहेत. त्याचे कर्ज रोखे संस्थेकडे आहेत.तर उर्वरित ६२ थकबाकीदारांंना कलम ९१ नुसार न्यायालयात वसूलीचे दावे दाखल केले आहेत.एकाच व्यक्ती कडून एकच रक्कम वेगवेगळी दोन वेळा वसूल दाखवून लेखापरिक्षकांनी राजकीय दबावाखाली संस्थेचे म्हणणेच विचारात घेतलेले नाही. यामुळे बलभीम विकास संस्थेची बदनामी करणाचा डाव आहे अशी माहिती संस्थेचे नेते व कुंभी कासारी कारखान्याचे संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संस्थेत ९० लाखाचा अपहार या लेखापरिक्षक संभाजी पाटील यांच्या अहवालातील मुद्यांवर खुलासा देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय पाटील म्हणाले संस्थेची अडत दुकाने आहेत यातून गुळ पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गूळ तारण कर्ज दिली जातात. यासाठी कर्जरोखे घेतली जाते. २०१५ ला संस्थेवर प्रशासक आले त्यांनी अडत दूकाने बंद केली.कोरोना काळात संस्थेचा हा विभाग बंद पडल्याने थकबाकी दिसू लागली. यावर उपाय म्हणून ६२ कर्जदारांच्यावर कलम ९१ खाली न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत. कर्ज घेणाऱ्या सर्व सभासदांनी कर्जे मान्यही केली आहेत.मग हा अपहार कसा असा सवाल त्यांनी केला.

बाजार समितीत असलेल्या एका गोडाऊनला भाडेतत्त्वावर मागणी आली. याचे छत खराब असल्याने शासकीय इंजिनीयर कडून मूल्यांकन करत नऊ लाख छतकामासाठी खर्च केले आहेत.पण यातून संस्थेला सहा लाख भाडेही मिळाले यामुळे ज्यांनी तक्रारी केल्या त्यांचा बदनामीचा हेतू आहे. यावर पुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव चौगले,संचालक चंद्रकांत पाटील, वसंत पाटील, मारुती वर्पे ,आनंदा जगदाळे,संजय सखाराम पाटील व सभासद उपस्थित होते