जिल्हा परिषदेच्या आढावा सभेत विविध कामांंबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेकडील सर्व जि.प. खाते प्रमुख,गट विकास अधिकारी, उपअभियंता बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा,बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका वैदयकिय अधिकारी यांची आढावा सभा शेंडा पार्क येथे घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.

सदर आढावा सभेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाच्या योजनांचा आढावा घेणेत आला.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ODF प्लस गांवे नोव्हेंबर 2023 अखेर 50% गांवे घोषित करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सुचना दिल्या. तसेच वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यांची कामे पूर्ण करणे हर घर जल अंतर्गत सर्व कुटुंबांना नळ कनेक्शन देणे, यामध्ये 3 तालुक्यांचे काम 100 टक्के पूर्ण असून व आणखी 5 तालुके 100 टकके पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ती डिसेंबर अखेर पूर्ण करणे जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शनचे 100 टक्के पूर्ण करुन घेणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

 स्व. मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजनेंतर्गत मंजूर कामे प्राधान्याने पूर्ण करणे.ग्रामपंचायत स्तरावर  1 ऑक्टो 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये जन सुरक्षा मोहिम बँकामार्फत राबविणेत येत आहे. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना या योजनेंच बीमा कार्ड 18 ते 70 वयोगटातील सर्व बचत बॅक खातेधारक यांचे काढणेत यावे. यामध्ये दिव्यांग लोकांना प्राधान्यान देणेच्या सुचना दिल्या.

 ग्रामपंचायत विभागाकडील 15 वा वित्त आयोगाचा निधीचा खर्च कमी असुन या अंतर्गत मंजूर कामे त्वरीत पूर्ण करुन निधी खर्च करणे त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान मध्ये सर्व ग्रामपंचायतींना सहभागी होणेचे आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून चांगले काम झालेली गांवे निवडण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी यांना स्वतः भेटी द्याव्यात अशा पाटील यांनी सूचना दिल्या.

ग्रामपंचायतीकडून Citizen App, QR कोड अशा डिजीटल पेमेंटच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे जिल्हा परिषदेकडील ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांची बरेच कालावधीपासून अपहार प्रकरणाबाबत सुरु असणाऱ्या चौकशी त्वरीत पूर्ण करुन अहवाल सादर करणे, अपहार प्रकरणामधील रक्क्म मोठी असुन ती वसुल करणेत यावी याबाबत देखील सत्ता सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेने पाणी अडवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी 664 वनराई बंधारे बांधले असुन अजून आवश्यक ठिकाणी बंधारे बांधणेत यावेत.

मनरेगा अंतर्गत जुने अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावेत तसेच संरक्षक भिंतीच्या आवश्यक असणाऱ्या शाळांचे प्रस्ताव 8 दिवसात सादर करावेत.

जिल्हा परिषद कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबीमध्ये कर्मचारी यांची जात पडताळणी करुन घेणे, 55 वर्षानंतर सेवेत मुदत वाढ, प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणे ,लेखा परिक्षण मधील सर्व पूर्तता अहवाल सादर करणे.
आरोग्य विभागाकडील जन्म-मृत्यु नोंदी ऑनलाईन पोर्टलवर भरणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या तपासणी अहवालामध्ये आलेल्या त्रुटी पूर्ण करणे.

आभा कार्ड काढणेमध्ये कागल तालुक्याने काम समाधानकारक केले असुन त्यास अनुसरुन इतर तालुक्यांनी कामात प्रगती करावी.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजना यांचे मंजूर घरकुले पाठपुरावा करुन त्वरीत पूर्ण करुन घ्यावेत. तसेच मोदी आवास योजनेतील OBC लाभार्थीचे शासन मार्गदर्शक सुचनेनुसार प्रस्ताव घेणेत यावेत. याबाबत या आढावा बैठकीत सूचना देण्यात आल्या.
या आढावा सभेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव तसेच जिल्हयातील सर्व खातेप्रमुख, सर्व गट विकास अधिकारी व तालुकास्तरीय खातेप्रमुख उपस्थित होते.