कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने ‘फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील मराठा समाजाला फसवलं आहे, मात्र इथून पुढे मराठा समाज फसणार नाही, चार दिवसात बैठक घेऊ आणि वेळ पडली तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील जिल्हा बंदी करू असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने यावेळी दिला. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘फसवे सरकार चले जाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोल्हापुरी चप्पल देखील दाखवले. मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून यावेळी काळ्या फिती बांधण्यात आल्या, तर महिलांनी काळे झेंडे दाखवले.यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी या आंदोलनात बाबा इंदुलकर ,बाबा पार्टे,विजय देवणे,आर.के.पोवार यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🤙 9921334545