मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पिके उपटून जागा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मराठा बांधवांची खास भेट

जालना: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती.या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशी सह लावलेली पिके उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते.अर्थात हातातोंडाशी आलेलं पीक उपटून फेकताना त्यांनी कुठलाच विचार केला नाही विचार केला तो समस्त मराठा बांधवांसाठी आरक्षणाचा.

या सभेला लाखोच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन,कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली.सभा तर निर्विघ्न पार पडली पण गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले. त्यांची ही अवस्था गावकऱ्यांना पहिली जात नाही.अश्यावेळी घनसावंगी तालुक्याच्या गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर पुढे सरसावले असून आपल्या शेतातील पिके मोडून जागा दिली,अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा क्विंटल गहू बियाणे व २१ बँग सरकी पेड घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर यांच्याकडून देण्यात येणार आहे.