कोल्हापूर: साडेतीन शक्तिपीठातील पूर्ण पीठ असलेले कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पलस्टँड कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्यावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने आज कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याला खासगी दुकानदारांनी विशेषत: महिलांनी जोरदार विरोध केला.
करवीर निवासी अंबाबाई मंदिराची भिंत आहे. त्या भिंतीला लागूनच हे खासगी चप्पल स्टँड आहे. हे चप्पल स्टँड काढण्यासाठी आज मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली.
अंबाबाई मंदिरात चप्पल स्टँडवरुन राडा, नेमका वाद काय? खासगी दुकानदारांचा विरोध का?
अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली. मात्र त्याला खासगी दुकानदारांनी विशेषत: महिलांनी जोरदार विरोध केला.