योगा, व्यायाम, मेडिटेशन याचा आणि मानसिक आरोग्याचा डायरेक्ट संबंध आहे. रोज योगा, मेडिटेशन करायलाच हवं. या सगळ्याने तणाव कमी होतो आणि डोकेदुखी कमी होते.
आल्याचा चहा कुणाला आवडत नाही? डोकेदुखी वर आल्याचा चहा हा उत्तम उपाय आहे. दाहक-विरोधी गुणधर्म असणारा आल्याचा चहा लोकांना खूप आवडतो, डोकं दुखायला लागलं की लोक हा चहा आवर्जून पितात.
अक्रोड, बदाम आणि काजू सारखे शेंगदाणे खाल्ल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते, कारण त्यात मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. मॅग्नेशियम जर मुबलक प्रमाणात खाल्लं तर डोकेदुखी होणार नाही, होत असेल तर कमी होईल.
डोकेदुखीचं सगळ्यात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. रोज १ ते ८ ग्लास पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होणार नाही आणि डोकेदुखीची समस्या होणार नाही. असली तरी यामुळे ती कमी होईल. हायड्रेशन हा उत्तम उपाय आहे.
