दुध उत्पादक सभासंदाचा दूध दरवाढीसाठी गोकुळ कार्यालयावर मोर्चा…

करवीर: करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर, म्हारूळ,आमशी, पासार्डे, कसबा बीड आदी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी गोकुळ प्रशासनाने गाय दुध दरात चार महिन्यांत 4रु कपात केली आहे.याच्या निषेधार्थ तसेच लम्पी मुळे दगावलेल्या जनावरांना सरासरी 20हजार अनुदान द्यावे, शिवाय पशूखाद्य दरात केलेली भरमसाठ वाढ कमी करावी अशा मागण्यांचे निवेदन चेअरमन अरुण डोंगळे यांना देण्यात आले.दुधाची आवक जास्त असलेने विक्री कमी झाली आहे.शिवाय दुधाची पावडर करून ती जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी पर्यंत च वापरता येते.परिणामी दुध दरात कपात केल्याशिवाय पर्याय नसलेच चेअरमन डोंगळे यांनी सांगितले..निश्चितच आपल्या निवेदनाचा विचार करून संचालक मंडळासमोर निवेदन मांडु व आपल्या मागणीचा विचार करू असे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले..

यावेळी दुध उत्पादक शेतकरी बबलू चौगले,आनंदा दिंडे यांनी प्रशासनाला विनंती करत आपली व्यथा सांगितली.आम्ही तरुणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास कर्ज घेवून व्यवसाय चालु केला आहे पण या धोरणामुळे आमचा कर्जाचा हप्ता थकत आहे.घर खर्च चालवणे मूश्किल झाले आहे.तरी त्वरीत आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावे असे भावनिक आवाहन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, हंबीरराव चौगले, संदिप पाटील,मारूती चव्हाण, ज्ञानदेव बचाटे,रंगराव बचाटे, जयवंत हावलदार,सूनिल बचाटे,संभाजी बचाटे, अजित चौगले,बळीराम नाळे आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते