शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत होणार एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल

कोल्हापूर : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने हाती घेतलेले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे. याबाबतचे शासन स्तरावरील प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता हे काम अतिशय वेगात सुरू आहे.

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह या चार इमारतींना भेटी दिल्या. या इमारतींमधील अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यासाठी निधीची गरज आहे. ही कामेही डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्यांचा लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तसेच; नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या केंद्रासाठीसुद्धा जागा मिळवण्यासाठी लवकरच मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. त्या केंद्राचाही शुभारंभ करता आला तर त्यासाठीही प्रयत्नशील असललयाचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

असे होणार हॉस्पिटल……□अकराशे बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल□न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०□मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०□मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०□परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३००□अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण……………

यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, डाॅ. गिरीश कांबळे व इतर प्रमुख