बहिरेश्वर येथील दुध उत्पादकसभासदांची दूध दर कमी व पशूखाद्य दरवाढ केलेबद्दल निषेध सभा..

बहिरेश्वर( प्रतिनिधी)… करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथून जवळपास 7000 लिटर दूध दिवसाकाठी गोकूळ दूधसंघाला पाठविले जाते.सर्वसामान्य दुध उत्पादक गोकुळ‌ दुध संघाच्या आधारावर आपला चरितार्थ चालवित आहे.परंतु गोकुळ दुध संघाने गेल्या चार महिन्यात गाईच्या दुध दरात 4 रुपये कपात केली आहे शिवाय पशुखाद्य दरात भरमसाठ वाढ केली आहे दिवसभर काबाडकष्ट करून आठवडी दुधाचे बीलातून आपला चरितार्थ चालविताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे

.म्हणून गोकुळ प्रशासनाने त्वरीत दुध दरवाढ करावी तसेच पशुखाद्य दरात कपात करावी यासाठी समस्त दूध उत्पादक सभासदांनी एकत्रित येवून वेताळ चौकात निषेध सभा आयोजित केली होती.

यावेळी गोकुळ प्रशासनाविरोधात दुध दर वाढ झालीच पाहिजे, पशुखाद्य दरात कपात केलीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.. यावेळी सर्व दुध उत्पादक सभासद यांच्या वतीने या निर्णयाचा निषेध करण्यात आला. ताराबाई पार्क येथे जाऊन उद्या या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.