कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची शनिवारी वार्षिक सभा

कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

दुपारी 1 वाजता मार्केट यार्ड येथील मल्टिपर्पज हॉल मध्ये सभा होणारआहे.सभापती भारतपाटील-भुयेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

गतवर्षी कोरोना असल्यामुळे सभा घेता आली नाही. त्यामुळे यावेळी २०२१-२२ व २०२२-२३ या सालातील ही सभा होणार आहे. या सभेसाठी समितीच्या कार्यक्षेत्रातील विकास सेवा संस्था व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे.

News Marathi Content