विज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी गरीब कुटुंबाच्या घरातील अंधार केला दुर..

राधानगरी / अरविंद पाटील : धामोड ता. राधानगरी येथे विज वितरणच्या कर्मचार्‍यांनी एका गरीब कुटुंबाच्या घरात स्वखर्चाने विज जोडली आहे . व ऐन गणपती सणात गरीबाच्या घरातील अंधार दुर करून विज वितरणचे कर्मचारी प्रकाशदुत बनले आहेत .

धामोड येथील जयवंत संतराम सुतार व त्यांची पत्नी हे गरीब दांपत्य गेली अनेक वर्षे दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये रहात आहेत . व ते दोघेही सतत आजारी असतात . घरात विज नसलेने कित्येक वर्षे अंधारात काढत आहेत . याची माहीती विज वितरणचे कर्मचारी विलास डवर यांना मिळताच त्यांनी वरीष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांशी बोलुन संबंधीत दांपत्याच्या घरात एका दिवसात विज कनेक्शन जोडले .

जोडणीसाठी येणारा सर्व खर्च शिरगांव शाखेचे अभियंता अनमोल भोसले धामोड उपकेंद्रातील विलास डवर युवराज चौगले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला .

विज वितरणचे कर्मचारी म्हंटलं की सामान्य नागरीक नाक मुरडतात . पण धामोड येथील विज वितरणचे कर्मचारी महापुर असो किंवा वादळ असो .

भर पावसात अखंड रात्रभर काम करून लोकांना सेवा देत असुन त्यांनी नावलौकीक मिळवला आहे . आज एका गरीब कुटुंबाच्या घरात विज जोडून बजावलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचे संपुर्ण राधानगरी तालुक्यात कौतुक होत आहे.

यावेळी वरिष्ठांच्या सहकार्यामुळेच असे उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन मिळत असलयाची माहीती अभियंता अनमोल भोसले या उपक्रमामध्ये शेखर जाधव निखील चौगले सागर पाटील शिवाजी कांबळे चंद्रकांत किल्लेदार संभाजी सुतार आदी विज वितरणचे कर्मकारी सहभागी झाले होते.

News Marathi Content