राधानगरी/ अरविंद पाटील : राधानगरीसारख्या दुर्गम भागात उच्च दर्जाचं शैक्षणिक संकुल उभारण्याचं स्वप्न पाहणं आणि असे व्यावसायिक शिक्षणक्रम चालवणं आव्हानात्मक पण हे आव्हान अभिजित तायशेटे यांनी यशस्वीपणे पेललंय,या शैक्षणिक संकुलाची वाटचाल ही विद्यापीठाच्या दिशेने सुरू असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी काढले ते जेनिसिस इन्स्टिट्यूटमध्ये बोलत होते.
राधानगरी गैबी तिट्टा येथील जेनेसिस कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना बस सुविधा शुभारंभ,अद्य्यावत संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन ,राधानगरी आणि परिसरातील विविध स्पर्धा परिक्षांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि दाजीपूर, हसणे, फेजीवडे भागातील शालेय मुलांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थी बस सुविधा शुभारंभ श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि आमदार प्रकाश अबीटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी स्पर्धात्मक आणि संगणकाचे युग आहे,संस्था स्थापन आणि ती यशस्वीपणे चालवणं अवघड असतं, जग प्रगतीपथावर असलं तरी आरोग्याच्या सुविधा कमी पडणार आहेत,शैक्षणिक गरज ओळखून जेनिसिस इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असणारे अभ्यासक्रम उज्वल भविष्याची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला.आमदार प्रकाश अबीटकर यांनी राधानगरीत मोठं शैक्षणिक संकुल आणि विद्यापीठ झालं नसल्याची खंत बाळगण्याची गरज नाही,जेनिसिस इन्स्टिट्यूटची विद्यापीठाकडे वाटचाल सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी शिष्यवृत्तीत राज्यात प्रथम असणारा तालुका सोयीसुविधा नसल्याने तालुक्यातील विद्यार्थी मागे राहतोय यामुळे उच्च आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याचं सांगितलं.प्राचार्य डॉ शोभराज माळवी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी अरुण जाधव, बशीर राऊत, दादासो सांगावकर, दीपक शेट्टी, शिवाजी चौगले,फारुख नावळेकर, मारूतीराव टिपुगडे, तानाजी चौगले, सुरेश बचाटे,संजय माळकर, विजय बलुगडे, राजेंद्र तायशेटे,विलास डवर, संजय पाटील, चंद्रकांत चौगले आदींसह मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन कुणाल मंडलीक यानी तर आभार डाॅ. शोभराज माळवी यानी मांडले.