कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यासाठीचे’नारीशक्ती वंदन’ विधेयक पारित करण्यात आल्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीन कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा विजयी घोषणाही यावेळी देण्यात आल्या.यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.शेजारीच असणाऱ्या महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी साखरपेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव,राहुल चिक्कोडे ,रुपाराणी निकम,माधुरी नकाते,हेमंत आराधे,वैशाली घरपणकर यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
