खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा ; सर्व पक्षीयांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : 62 हजार शाळांचे खाजगीकरण व सरकारी नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

सरकार संविधान व लोकशाही विरोधी काम करत असून बहुजनांच्या पिढीला गुलामगिरीकडे नेवू पाहत आहे ,असा आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी शिक्षणाचे खाजगीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो ,शिक्षणाचे खाजगीकरण करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा धिक्कार असो ,महात्मा फुले की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, सरकारी कंत्राट भरती रद्द झालीच पाहिजे, भारतीय संविधानाचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी व्यंकाप्पा भोसले, वसंतराव पाटील, एड. शिवराज खोराटे ,विलासराव इरुडकर, शिवाजीराव परुळेकर, नंदकुमार गोंधळी, प्रा. किसन कुराडे , बी.के.कांबळे आदी उपस्थित होते.

News Marathi Content